Sunday 27 December 2015

खरबूज लागवड तंत्र
-
Monday, December 28, 2015 AT 02:45 AM (IST)
Tags: agro planing
खरबुजाची लागवड थंडी कमी झाल्यानंतर केली जाते. या वेळी केलेल्या लागवडीची फळे बाजारात अधिक मागणीच्या काळात (एप्रिल-मे महिन्यात) येतात. त्यामुळे या फळांचा चांगला दर मिळू शकतो. त्यामुळे सध्या खरबूज लागवडीचे नियोजन करावे.
प्रा. एम. एच. गावडे, लीना शिंदे, विशाखा पोहरे 

खरबूज पिकाची लागवड यापूर्वी फक्त नदीपात्रातच होत होती. मात्र आता या पिकाची लागवड शेतजमिनीमध्येही मोठ्या प्रमाणात होत आहे.
महाराष्ट्रात गिरणा, तापी, वैनगंगा, पूर्णा, दुधना, गोदावरी, वर्धा इत्यादी नद्यांच्या पात्रात खरबूज लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. खरबुजाच्या फळाचा स्वाद व गराचा रंग यामध्ये भरपूर विविधता असते, म्हणून या फळाला विशेष महत्त्व आहे.

जमीन आणि हवामान - 
खरबूज पिकाच्या लागवडीस मध्यम काळी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी रेताड, पोयट्याची किंवा गाळाची जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७ असावा. अत्यंत हलकी किंवा चुनखडीयुक्त जमीन या पिकासाठी निवडू नये. या पिकास भरपूर सूर्यप्रकाश, उष्ण आणि कोरडे हवामान मानवते. वेलीच्या वाढीसाठी २४ ते २६ अंश सेल्सिअस तापमान उपयुक्त ठरते.

लागवड - 
खरबुजाची लागवड जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात थंडी कमी झाल्यानंतर करतात. या पिकाची फळे एप्रिल-मे महिन्यात काढणीस तयार होतात.
फळे वाढत असताना तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त गेल्यावर फळात अधिक गोडी तयार होते.

सुधारित आणि संकरित जाती - 
१. पुसा शरबती -
या जातीची फळे ८५ दिवसांत तयार होतात. आकाराने गोल असतात. फळावरील साल जाळीदार असते. गराचा रंग नारंगी असतो. एका फळाचे वजन ५०० ते ७५० ग्रॅम असते. गरात साखरेचे प्रमाण ११ ते १२ टक्के असते. सरासरी उत्पन्न १० ते १३ टन प्रति हेक्‍टरी मिळते.

२. पुसा मधुरस -
या जातीची फळे आकाराने गोलाकार चपटी असून, वजनाला सरासरी एक किलोपर्यंत असतात. सालीचा रंग फिकट हिरवा त्यावर गडद हिरव्या रंगाचे पट्टे असतात. गरात साखरेचे प्रमाण १२ ते १४ टक्के असते. फळाचे सरासरी उत्पन्न १२ ते १६ टनांपर्यंत प्रति हेक्‍टरी मिळते.

३. हरा मधू -
या जातीला फळे उशिरा लागतात. फळे मोठी आकाराने गोल असून, फळावर गडद हिरव्या रंगाचे पट्टे असतात. गराचा रंग हिरवट असतो. गरात साखरेचे प्रमाण १२ ते १५ टक्के असते. फळामध्ये बिया कमी असतात. फळाचे सरासरी वजन एक किलोपर्यंत असते. या जातीशिवाय खरबुजाची पांढऱ्या गराची अरका, राजहंस, अराक जीत, हिसारमधून, आर. एस.-४ पंजाब सोनेरी, दुर्गापुरा मधू, पुसा रसराज, पंजाब रसिला इत्यादी सुधारित वाण आहेत.

४. पंजाब हायब्रीड -
खरबुजाचा हा संकरित वाण असून, वेली लांब २ ते २.५ मीटर लांबीच्या असतात. फळे हलक्‍या पिवळ्या रंगाची असतात. हलक्‍या रंगाची धारा असलेली जाळीदार साल, गर केशरी रंगाचा, चांगला स्वाद व सुगंध असणारी फळे, फळांना चांगली साठवण क्षमता असते. फळाचे वजन ४ ते ५ किलोपर्यंत असते.

बियाण्याचे प्रमाण -
खरबुजाचे १.५ ते २ किलो बियाणे प्रति हेक्‍टरी पुरेसे होते. एक लिटर पाण्यात २ ग्रॅम थायरम टाकलेल्या द्रावणात बिया भिजवून बाहेर काढाव्यात. या बिया ओल्या फडक्‍यावर २४ ते २८ तास ठेवून लागवड केल्यास उगवण चांगली होते. किंवा बी लागवडीपूर्वी १२ तास कोमट पाण्यात भिजवून नंतर रात्रभर ओल्या बारदाण्यात बांधून ठेवावे म्हणजे उगवण चांगली होते. पाटाच्या काठाला खड्डा करून ३-४ बिया २-३ सें.मी. खोल टोकाव्यात. बिया मातीने झाकून हलक्‍या हाताने माती दाबून घ्याव्यात. त्यानंतर हलके पाणी द्यावे. पाण्याची पातळी बी पेरलेल्या उंचीपेक्षा कमी असावी.

लागवडीचे अंतर आणि लागवड पद्धत - 
खरबुजाची लागवड रुंद सरी वरंबा पद्धतीने करतात. दोन सरीतील अंतर १.५ मीटर आणि दोन वेलीतील अंतर १ मीटर ठेवावे. खरबूज आळे पद्धतीने तसेच रुंद वाफे पद्धतीने लावता येते.

बीज प्रक्रिया -
खरबूज बियाण्यास पेरणीपूर्वी कॅप्टन किंवा कार्बेन्डाझिम २.६ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात चोळावे.

खते आणि पाणी व्यवस्थापन 
- खरबूज पिकास २५ ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत, ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश लागवडीच्या वेळी प्रति हेक्‍टरी द्यावे. लागवडीनंतर एक महिन्याने ५० किलो नत्राची दुसरी मात्रा द्यावी.
- एक महिन्याने नत्राची मात्रा दिल्यानंतर पिकास भर लावून घ्यावी. पिकास उगवण होईपर्यंत दोन पाण्याच्या पाळ्या लवकर द्याव्यात. त्यानंतर जमिनीच्या मगदूरानुसार वाफ्यावर पिकास पाणी द्यावे.

आंतरमशागत व वेलींना वळण देणे 
बियांची उगवण झाल्यानंतर नांगे असणाऱ्या ठिकाणी बी टोकून पाणी द्यावे. वाढणारे वेल पाटाच्या मधल्या भागात पसरू द्यावेत. वाढणाऱ्या फळांना पाणी लागू देऊ नये. पीक तणविरहीत ठेवावे. त्यासाठी दोन-तीन खुरपण्या कराव्यात.
- पीक ३५ ते ४० दिवसांचे झाल्यानंतर वेली जास्त हलवू नयेत. फळे लागल्यानंतर रोगट फळे काढून टाकावीत.
- ग्रीन हाउस किंवा पॉलिहाऊसमध्ये खरबुजाच्या संकरित वाणाची लागवड तारेवर वेली चढवून करता येते. त्यामुळे फळाचे अधिक उत्पादन मिळते.

काढणी व उत्पादन - 

खरबुजाचे फळ पिकू लागल्यानंतर फळाचा भरपूर वास येतो आणि देठ फळापासून वेगळे होते. फळाच्या सालीचा रंग बदलतो. फळे जास्त जाळीदार होतात. जाळीच्या मधली जागा पिवळसर होते. खरबुजाचे हेक्‍टरी २० ते २५ टनांपर्यंत उत्पादन मिळते.

Saturday 28 November 2015

विद्येविना मती गेली |
मतीविना निती गेली | |
नितीविना गती गेली |
गतीविना वित्त गेले | |
वित्ताविना शुद्र खचले |
एवढे अनर्थ एका अविद्येने केले | |

ज्योतीराव फुलेंनी हे जाणले होते. म्हणूनच त्यांनी सर्वप्रथम या ज्ञान सत्तेवरील ब्राह्मणी वर्चस्वाला सुरुंग लावण्याचे काम केले.
त्यांनी १८४८ साली मुलींसाठी पहिली शाळा काढली. हे सांगणे जितके महत्वाचे आहे त्याही पेक्षा त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणास प्राधान्य कादिले हे सांगणे जास्त महत्वाचे ठरेल. कुठलाही समतेवर आधारित समाज स्त्री-पुरुष समतेशिवाय अस्तित्व येऊ शकत नाही व स्त्री पुरुष समता स्त्रियांच्या शिक्षणा शिवाय शक्य नाही स्त्रिया शिकल्या पाहिजेत त्यांनालिहिता, वाचता आले पाहिजे. त्याद्वारे त्यांना समाजाचे समग्र आकलन होईल.या भूमिकेतून क्रांतिसूर्य ज्योतीराव फुले स्त्रियांच्या शिक्षणाकडे पाहत होते.

एकदा व्हाईट नावाचा एक इंग्रज अधिकारी पुण्याच्या आसपास शाळांची पाहणी करत असतांना एक पंतोजीने टेबलवर छडी शेजारी काही ढेकळे ठेवल्याचे त्याला दिसले. विचारले असता तो पंतोजी म्हणाला या छडीने मी जर शूद्राति शूद्र मुलांना मारले तर ती बाटेल म्हणून त्यांना दुरून फेकून मारण्यासाठी हि ढेकळे ठेवली आहेत. ब्राह्मणां मध्ये एक म्हण लोकप्रिय आहे.
"छडी लागे छमछम ! विद्या येई घमघम!!"

आम्हा शुद्रती शुद्रांना त्यांची छडीही स्पर्श करीत नव्हती तर विद्या मिळणे हि फारच दूरची गोष्ट होती. आणि म्हणून क्रांतिसूर्य ज्योतीराव फुलेंनी शूद्रातिशूद्रांकरिता मोफत शिक्षण सुरुकेले.१८८२ साली हंटर आयोगाला दिलेल्या निवेदनात ज्योतीराव फुले म्हणतात."सरकारला मिळणारा महसूल बहुजनांचा आहे. या महसुलावर ब्राह्मण शिक्षण घेतात. पण तेच ब्राह्मण लोक बहुजनांच्या शिक्षणास मात्र विरोध करतात!" असे झणझणीत अंजन फक्त फुलेच घालू शकले. म्हणूनच म्हणावेसे वाटते कि क्रांतिसूर्य फुलेंच्या तुलनेत राधाकृष्णन यांनी असे काय केले कि ज्यामुळे शासनाने त्यांच्या जन्मदिवशी शिक्षक दिन साजरा करण्याचे फर्माणसोडले? म्हणून ५ सप्टेंबर ऐवजी २८ नोव्हेंबर ज्योतीराव फुलेंचा स्मृतिदिन खरा शिक्षक दिन साजरा करणे हे बाबासाहेब डॉ. आंबेडकरांच्या शब्दात आधुनिक भारताच्या सर्वश्रेष्ठ शिक्षकास खरे अभिवादन ठरेल.
आच्छादनाचे ५o चमत्कार......
१ ) तणांचा कायमचा बंदोबस्त होतो .
२ ) पाण्याची ५० % बचत होते .
३ ) सर्वच प्रकारच्या जीवजंतुंची जमिनीत                                झपाटयाने वाढ होते .
४ ) जमिनीची सुपिकता वाढते .
५ ) जमिनीचा पोत वाढतो .
६ ) हवेतील ओलावा ओढून घेते .
७ ) नत्र उपलब्ध होते .
८ ) प्रथिनांचे प्रमाणानुसार कुजण्याचा 'वेग वाढतो.
९ )सजिवता वाढते .
१० ) पक्व वनस्पती आच्छादनाबरोबर तरूण वनस्पती आच्छादनाचे लवकर विघटन होते.
११ ) जमिनीत संजिवकांची निर्मिती होते .
१२ ) जमिनीत नविन घडण होते .
१४ ) पिकांच्या वाढीला आवश्यक अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.
१५ ) स्थिर कर्ब जमिनीत स्थिरावतो.
१६ ) आंतरकाष्टांगजन्य विघटन.
१७ ) मर प्रतिबंधकता पिकात प्राप्त होते.
१८ ) सर्वच जैव रासायनिक क्रिया -प्रक्रियांचे नियंत्रण होते .
१९ ) जमिनीत वेगाने ह्युमसची निर्मिती होते.
२० ) कर्ब- नत्र गुणोत्तर कमीत कमी होते.
२१ ) एकदल-द्विदल आंतरपिकांचे आच्छादन मायेचा पदर असतो .
२२ ) जमिनीतील बंदिस्त अन्नद्रव्ये उपलब्ध होतात .
२३ ) मातीची धूप थांबून पाणी जिरते.
२४ ) आच्छादनाने देशी गांडूळे चमत्कार करतात.
२५ ) जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते.
२६ ) आंतरपिकांची मुळे कुजवून जमिनीस पहेलवान बनवण्याचे कार्य करते.
२७ ) जमिनीत मुबलक सुर्यशक्ति साठविली जाते.
२८ ) पिकाचा अन्न तयार करण्याचा वेग वाढतो.
२९ ) पिकांत साखरेचे प्रमाण , उत्पादन वाढवते व काष्टांचे उपलब्धता होते .
३० ) पिक प्रती पिक उत्पादन वाढतच राहते.
३१ ) बेण्याची उगवण व वाढीसाठी आवश्यक उष्णतामान मिळवून देते .
३२ ) उन्हाळ्यात व दुष्काळात फळझाडे व पिकांना जिवंत ठेवून जगवते.
३३ ) जिवाणू संख्या वाढतच राहते प्रकर्षाने जाणवणाऱ्या रोगांना आळा बसतो.
३४ ) जलधारणाशक्ती वाढते.
३५ ) जमिनीचा सामू नियंत्रित होतो.
३६ ) खारे पाणी सुसह्य होते.
३७ ) फळझाडांना भरपूर आधारमुळे फुटतात.
३८ ) जमिनीतील व हवेतील उष्णता ह्यांचे मधील परस्पर अदलाबदली रोखली जाते.
३९ ) जमिनीला अतिनील किरणांपासून वाचविते.
४० ) जमिनीत शक्ती संतुलन बनते.
४१ ) जमिनीत जैवगतीशास्त्राला चालना मिळते.
४२ ) वैश्विक किरनांना पकडून फळे व पिकांची प्रत सुधारते.
४३ ) पिकांची व फळांची चव तर वाढतेच शिवाय टिकाऊपणा पण वाढतो .
४४ ) हवेतील आर्द्रता वेळप्रसंगी मुळयांना व जिवाणूंना पुरवली जाते .
४५ ) जमिन क्षारपड होण्यापासुन वाचते.
४६ ) जमिनीवरिल वातावरण खेळते राहते.
४७ ) जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक नियंत्रित होतो.
४८ ) जमिनीचे शुद्धिकरण होऊन पिकांत प्रतिकारशक्ति निर्माण होते .
४९ )जमिनीत गुरुत्वाकर्षण व केशाकर्षण शक्तींचे संतुलन साधले जाते .
५० ) सर्वात महत्वाचे म्हणजे जमिन वापसा स्थितीत राहते.🔴