Saturday 28 November 2015

विद्येविना मती गेली |
मतीविना निती गेली | |
नितीविना गती गेली |
गतीविना वित्त गेले | |
वित्ताविना शुद्र खचले |
एवढे अनर्थ एका अविद्येने केले | |

ज्योतीराव फुलेंनी हे जाणले होते. म्हणूनच त्यांनी सर्वप्रथम या ज्ञान सत्तेवरील ब्राह्मणी वर्चस्वाला सुरुंग लावण्याचे काम केले.
त्यांनी १८४८ साली मुलींसाठी पहिली शाळा काढली. हे सांगणे जितके महत्वाचे आहे त्याही पेक्षा त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणास प्राधान्य कादिले हे सांगणे जास्त महत्वाचे ठरेल. कुठलाही समतेवर आधारित समाज स्त्री-पुरुष समतेशिवाय अस्तित्व येऊ शकत नाही व स्त्री पुरुष समता स्त्रियांच्या शिक्षणा शिवाय शक्य नाही स्त्रिया शिकल्या पाहिजेत त्यांनालिहिता, वाचता आले पाहिजे. त्याद्वारे त्यांना समाजाचे समग्र आकलन होईल.या भूमिकेतून क्रांतिसूर्य ज्योतीराव फुले स्त्रियांच्या शिक्षणाकडे पाहत होते.

एकदा व्हाईट नावाचा एक इंग्रज अधिकारी पुण्याच्या आसपास शाळांची पाहणी करत असतांना एक पंतोजीने टेबलवर छडी शेजारी काही ढेकळे ठेवल्याचे त्याला दिसले. विचारले असता तो पंतोजी म्हणाला या छडीने मी जर शूद्राति शूद्र मुलांना मारले तर ती बाटेल म्हणून त्यांना दुरून फेकून मारण्यासाठी हि ढेकळे ठेवली आहेत. ब्राह्मणां मध्ये एक म्हण लोकप्रिय आहे.
"छडी लागे छमछम ! विद्या येई घमघम!!"

आम्हा शुद्रती शुद्रांना त्यांची छडीही स्पर्श करीत नव्हती तर विद्या मिळणे हि फारच दूरची गोष्ट होती. आणि म्हणून क्रांतिसूर्य ज्योतीराव फुलेंनी शूद्रातिशूद्रांकरिता मोफत शिक्षण सुरुकेले.१८८२ साली हंटर आयोगाला दिलेल्या निवेदनात ज्योतीराव फुले म्हणतात."सरकारला मिळणारा महसूल बहुजनांचा आहे. या महसुलावर ब्राह्मण शिक्षण घेतात. पण तेच ब्राह्मण लोक बहुजनांच्या शिक्षणास मात्र विरोध करतात!" असे झणझणीत अंजन फक्त फुलेच घालू शकले. म्हणूनच म्हणावेसे वाटते कि क्रांतिसूर्य फुलेंच्या तुलनेत राधाकृष्णन यांनी असे काय केले कि ज्यामुळे शासनाने त्यांच्या जन्मदिवशी शिक्षक दिन साजरा करण्याचे फर्माणसोडले? म्हणून ५ सप्टेंबर ऐवजी २८ नोव्हेंबर ज्योतीराव फुलेंचा स्मृतिदिन खरा शिक्षक दिन साजरा करणे हे बाबासाहेब डॉ. आंबेडकरांच्या शब्दात आधुनिक भारताच्या सर्वश्रेष्ठ शिक्षकास खरे अभिवादन ठरेल.

No comments:

Post a Comment